या रस्त्याकडे कोणी रस्त्याकडे लक्ष देईल का…???
शाहूनगर ते बीके कंग्राळी येथील रस्त्याचे अवस्था अत्यंत बिकट झाली आहे.येथील रस्त्यावर खड्डे पडले असल्याने गावकऱ्यांना येजा करताना कसरत करावी लागत आहे.सध्या पावसाचे दिवस असल्याने सर्व खड्ड्यांमध्ये पाणी साचले आहे.त्यामुळे पावसाचा अंदाज न आल्याने अनेक अपघात घडत आहेत.
तसेच येथील काम करण्याकडे अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष झाले. असल्याने कामानिमित्त येतांना नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.त्यामुळे या मार्गावरील खड्डे त्वरित बुजवावे आणि नागरिकांना होणारा त्रास कमी करावा अशी मागणी या भागातील नागरिकांनी केली आहे.