पंडित नेहरू पदवीपूर्व महाविद्यालयातील प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांचे स्वागत
शहापूर, येथील पंडित नेहरू पदवी पूर्व महाविद्यालयात वन महोत्सव व प्रथम वर्षाच्या कला व वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांचे महाविद्यालयाच्या व द्वितीय वर्ष विद्यार्थ्यांच्यावतीने स्वागत समारंभ आयोजित करण्यात आला.
कार्यक्रमास हिंदुस्तान पेट्रोलियम चे व्यवस्थापकीय संचालक श्रीमान प्रतीक देबार्ता व लायन्स क्लब ऑफ बेळगाव मेनचे नूतन अध्यक्ष श्रीमान सोमनाथ कोळकी हे प्रमुख अतिथी म्हणून लाभले होते. तसेच महाविद्यालयाच्या प्राचार्या श्रीमती ममता पवार यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम संपन्न झाला.
श्री प्रतिक देबार्ता यांनी आपल्या अतिथी भाषणात विद्यार्थ्यांना उद्देशून आपल्या गतकाळातील महाविद्यालयीन विद्यार्थी दशेतील आठवणींना उजाळा करून दिला. विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनात सक्षम होण्यासाठी शिक्षकाप्रती आदर भावना ठेवून, अभ्यासाबरोबरच एखादा छंद जोपासावा, असे सांगितले. तसेच सोमनाथ कोळकी यांनी आपले मनोगत व्यक्त करताना, ज्ञान हे सर्वश्रेष्ठ आहे, विद्यार्थ्यानी आपल्या जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर जास्तीत जास्त ज्ञान संपादन केले पाहिजे, असे सांगितले. तसेच अध्यक्ष भाषणात प्राचार्या ममता पवार यांनी विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्षातील घटनाक्रमांची माहिती दिली.
कार्यक्रमाची सुरुवात कुमारी तज्ञा गुरव आणि ग्रुप यांच्या स्वागत गीताने झाली. तर पाहुण्यांची ओळख व परिचय महाविद्यालयाच्या व्याख्यात्या श्रीमती स्मिता मुतगेकर यांनी केले. त्याचबरोबर प्राध्यापक के एल शिंदे यांनी उपस्थित पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. तसेच बारावीच्या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. आरती गोरल व कु. रामलिंग मोरे यांनी कार्यक्रमाचे आभार मानले केले. कार्यक्रमाला बहुसंख्येने प्रथम वर्ष व द्वितीय वर्षाचे विद्यार्थी व शिक्षकवृंद उपस्थित होते.