मंदिरामध्ये मोबाईल बंदी करण्याचा आदेशाचे स्वागत
मंदिरांसारख्या पवित्र ठिकाणी शांत व भक्तीपूर्ण वातावरण निर्माण करण्याच्या उद्देशाने मंदिरामध्ये मोबाईल बंदी करण्याचा आदेश धर्मादाय खात्याने घेतला आहे.
त्यामुळे राज्यातील प्रमुख मंदिरांमध्ये मोबाईल वापरण्यावर बंदी असणार आहे मंदिरात जाण्यापूर्वी भाविकांनी आपला मोबाईल स्विच ऑफ करावे लागणार आहे. मंदिरामध्ये असलेली शांतता भंग होऊ नये तसेच मंदिरामध्ये शांततेचे वातावरण निर्माण व्हावे.
भाविकांची एकाग्रता भंग होऊ नये याकरिता आता धर्मादाय खात्याने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला हा आदेश धर्मादाय खात्याने सोमवारी जारी केला असून त्यानुसार शहरांमध्ये कपिलेश्वर मंदिर टिळकवाडी साई मंदिर अनगोळ परमार्थ निकेतन श्रीहरी मंदिर सौंदत्ती यल्लामा चिंचली मायाक्का मंदिर यासह मंदिरांमध्ये मोबाईल वापरण्यावर बंदी घातली आहे. आणि या निर्णयाचे स्वागत प्रमोद मुतालिक यांनी केले असून पत्रकार परिषदेत यासंबंधी संपूर्ण माहिती दिली आहे.