*जैन मुनि च्या मारेकऱ्यांना कठोर शिक्षा द्या*
जैन मुनि काम कुमार नंदी महाराजांच्या हत्येचा मुख्य आरोपी नारायण माळी आहे असे म्हटले जाते. जर मुख्य आरोपी मुस्लिम असता तर भाजपने राज्याला आग लावली असती. त्यामुळे आता हिरेकोडी नंदी आश्रमाचे जैन मुनि काम कुमार नंदी महाराज यांच्या मारेकऱ्यांना कठोरात कठोर शिक्षा देण्यात यावी अशी मागणी सोशालिस्ट डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाचे राज्य सरचिटणीस अफसर कोडोलीपेठ यांनी केली.
आज शहरात पत्रकार परिषदेत त्यांनीही मागणी केली असून यावेळी ते म्हणाले की भाजप सरकारच्या कार्यकाळात कायदा व सुव्यवस्था ढासळली होती त्यानंतर राज्यात सत्तेवर आलेल्या काँग्रेस सरकारच्या काळातही तीच परिस्थिती आहे.
राज्यात ढासळणारी कायदा व सुव्यवस्था बळकट करण्यासाठी सरकारने तातडीने पावले उचलावीत अशी मागणी त्यांनी यावेळी पत्रकार परिषदेत केली. यावेळी ते पुढे म्हणाले की जैन मुनि काम कुमार नंदी महाराजांची भयावह आहे अत्यंत भयानक उदाहरण आहे त्यामुळे सरकारने त्यांच्या मारेकऱ्यांना कठोरात कठोर शिक्षा द्यावी अशी मागणी केली. यावेळी पत्रकार परिषदेत एसडीपीआयचे नेते मकसूत मकानदार जाकीर नाईकवाडी यांच्यासह आदी उपस्थित होते.