*शालेय विद्यार्थ्यांनी बनवले लाईटचे पेन*
अनेक वेळा बंद पडणाऱ्या विद्युत पुरवठ्यामुळे विद्यार्थ्यांचे हाल होतात ऐन परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांना या समस्येला तोंड द्यावे लागते. त्यामुळे विद्यार्थ्यांची यातून सुटका करण्याकरिता कत्रीदड्डी येथील नववीच्या विद्यार्थ्यांनी असे एक पेन तयार केले आहे ज्याच्यामुळे अंधारात सहजपणे लिहिता आणि वाचता सुद्धा येऊ शकते. आणि या पेन ला सेल आणि बल्प च्या मदतीने एक पेन तयार केले आहे.
एज्युकेशन इंडियाचे संस्थापक आणि सीईओ डॉक्टर मंजीत जैन यांनी या विद्यार्थ्यांचे प्रयत्न पाहून स्टार हे या पेन मध्ये अनेक दुरुस्ती करून सदर लाईट स्टार ग्रुप पेन सर्वत्र वितरित करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती त्यांनी आज आयुष्य केलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
सदर पत्रकार परिषद शहरातील एका खाजगी हॉटेलमध्ये आयोजित करण्यात आली होती यावेळी एज्युकेशन इंडियाचे आनंद कडीकोट आणि काशिनाथ यांनी सदर पेन देशभरातील ग्रामीण भागामध्ये विद्यार्थ्यांना वितरीत करण्यात येणार असल्याचे सांगितले.
लाईट स्टार ग्रुपच्या विद्यार्थ्यांना प्रतिसाद देण्यासाठी एज्युकेशन इंडियाचे संस्थापक आणि सीईओ डॉक्टर मनाजीत जैन यांनी 20 लाख रुपये गुंतवून दहा हजार पेन चा पुरवठा करण्याची मागणी केली असल्याची देखील माहिती यावेळी पत्रकार परिषदेत देण्यात आली