यल्लामा देवस्थानच्या देणगीमध्ये मोठी वाढ
कर्नाटक सरकारच्या शक्ती योजनेअंतर्गत महिलांसाठी मोफत वाहतुकीची सुविधा उपलब्ध करून दिल्याने यल्लामा देवस्थानच्या देणगीमध्ये मोठी वाढ झाली आहे.
गेल्या दोन महिन्यात श्री यल्लमा देवी मंदिराचे उत्पन्न एक कोटी 37 लाखावर गेले आहे. या देणगी मध्ये एक कोटी 30 लाख 42 हजार 472 इतकी रोख रक्कम 4 लाख 44 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि दोन लाख 29 हजार रुपये चांदीचे दागिन्यांचा समावेश आहे.
शक्ती योजनेच्या माध्यमातून महिलांच्या दर्शनाच्या मोठ्या संख्येने होणाऱ्या आगमनामुळे मंदिराच्या उत्पन्नात वाढ झाली असून ती दोन महिन्यातच एक कोटी 37 लाखावर गेली आहे.
कर्नाटकातील विविध जिल्ह्यातील भाविक यल्लमाचे दर्शन घेण्याकरिता येत असतात तसेच देणगी सुद्धा देत असतात गेल्या दोन महिन्यापासून बस प्रवास मोफत असल्याने महिलांनी या ठिकाणी गर्दी करत देवीचे दर्शन घेतले आणि उत्पन्न वाढविले.