विमा कंपनीला न्यायालयाचा दणका :नुकसान भरपाई म्हणून 1 कोटी 62 लाख 50 हजार रुपये देण्याचा आदेश
विमा कंपनीला न्यायालयाचा दणका बसला आहे. एका अपघातात दुचाकी स्वार मागे बसलेल्या व्यक्तीचा मृत्यू झाला असल्याने ही विमा कंपनीला न्यायाल्याने नुकसान भरपाई म्हणून एक कोटी 62 लाख 50 हजार रुपये देण्याचे आदेश दिले आहेत.
मयत चंद्रशेखर शिवपुत्रप्पा देशांण्णावर वय 28 राहणार ता बैलहंगल हा त्याचा मित्र प्रवीण नागेश शिगेहोळळी वय 30 राहणार हेब्बाळ तालुका हुक्केरी हे देवप्रयाग येथे उत्तराखंड मोटरसायकल वरून चालले होते.
दरम्यान ट्रकने दुचाकीला धडक दिली यामध्ये दुचाकी स्वार मागे बसलेल्या व्यक्तीचा मृत्यू झाला ट्रकचा विमान होता त्यामुळे ट्रक मालकाकडून नुकसान भरपाई मिळणे अवघड जाणार होते दरम्यान दुचाकी स्वराची चूक नव्हती दुचाकी वर विमा असलेल्या कंपनी विरोधात दावा दाखल केल्यानंतर त्या विमा कंपनीने एक कोटी 62 लाख 50 हजार रुपये देण्याचे आदेश मुख्य उच्च दिवाणी न्यायालयाने दिला आहे.
25 जानेवारी 2017 रोजी हा अपघात घडला होता यावेळी दुचाकीचा विमान होता मात्र ट्रकचा विमा तसेच स्ट्रोक चालकाला वाहन चालविण्याचा परवाना देखील नसल्यामुळे विमा कंपनीवरच नुकसानीसाठी दावा दाखल करण्यात आला आहे.
यावेळी वकील व बार असोसिएशनचे उपाध्यक्ष सुधीर चव्हाण आणि ॲडव्होकेट एन आर लातूर यांनी मयताच्या कुटुंबीयांना नुकसान भरपाई देण्याकरिता काम पाहिले. तसेच सदर खटला लढून त्यांनी कुटुंबीयांना तातडीने नुकसान भरपाई मिळवून दिली.