गोमांस वाहतूक करत असणाऱ्या दोघांना टेम्पो सह ताब्यात
खानापूर : आज सकाळी रूमेवाडी हद्दीतील गोवा क्रॉस येथे खानापूर पोलीस स्थानकाचे पोलीस सब इन्स्पेक्टर श्री गिरीश व त्यांच्या सहकाऱ्यांनी गोमांस वाहतूक करत असलेला एक टेम्पो व एक बलेरो पकडून दोघा जणांना ताब्यात घेतले आहे.
टेम्पो क्रमांक जीए 08 व्ही 08955, व बलेरो क्रमांक जीए 03 डब्लू 4621 ताब्यात घेऊन तपासणी केली असता त्यामध्ये म्हशीचे 1700 किलो मांस आढळून आले. त्याची किंमत 2 लाख 21 हजार असल्याचे समजते, तसेच या प्रकरणी दावल मलिक मुख्तार अहमद मुनुरकर राहणार अलवार तसेच अकिब अल्ताफ किनी टिपू सुलतान नगर पिरवाडी बेळगाव या दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर
खानापूर पोलीस स्थानकात गुन्हा क्रमांक 165/2023 कलम 04,12 karnataka preventions of cow slanghter & cattle prevention act 2020 (u/s-4,12) Indian motar vehicle act, 1988 (u/s-192(A) या कायदा अन्वये गुन्हा दाखल केला आहे. सदर गुन्हा शिवकुमार बल्लारी यांनी नोंद केला आहे पुढील चौकशी खानापूर पोलीस करत आहेत.