https://facebook.com/1467349944017309
नवसाला पावणारी देवी अशी ख्याती असलेल्या वडगावची मंगाई यात्रा भक्तिमय वातावरणात असंख्य भाविकांच्या उपस्थितीत पार पडली.
वडगाव येथील मंगाई देवीच्या मंदिराच्या परिसरात पूजा साहित्याची विक्री करणाऱ्या विक्रेत्यांच्या बरोबरच कोंबड्या विक्री करणाऱ्यांनी देखील गर्दी केली होती.गेल्या एक महिन्यापासून देवीचे वार पाळून धार्मिक विधी करण्यात येत होते.
मंगळवारी यात्रेचा मुख्य दिवस असल्याने गाऱ्हाणे उतरवून यात्रेचे धार्मिक विधी मानकरी आणि मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडले.सकाळपासून भाविकांनी देवीचे दर्शन घेण्यासाठी मंदिरात गर्दी केली होती.महाराष्ट्र,कर्नाटक आणि गोव्यातून यात्रेसाठी मोठ्या संख्येने भाविक दाखल झाले होते.
अनेक भक्तांनी मंदिराच्या छतावर कोंबड्या आणि पिल्ले उडवून आपला नवस फेडला.मंदिर परिसरात खेळणी ,पूजा साहित्याची दुकाने थाटण्यात आली होती.रात्री उशिरा पर्यंत भक्तांनी दर्शनासाठी गर्दी केली होती.पोलिसांनी मंदिर परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवला होता.