https://fb.watch/lJ64jCQo8K/?mibextid=Nif5oz
जैन स्वामींच्या हत्या प्रकरणाची उच्च चौकशी करा
हिरेकोडीच्या जैन स्वामींच्या हत्या प्रकरणाची उच्च चौकशी करण्याची मागणी आज विश्व हिंदू परिषद बजरंगला तर्फे पत्रकार परिषदेत करण्यात आली. यावेळी सदर पत्रकार परिषद कन्नड साहित्य भवन मध्ये आयोजित करण्यात आले होती.यावेळी याप्रकरणी उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी करण्यात आली.
यावेळी या पत्रकार परिषदेत कारंजी मठाचे गुरुसिद्ध स्वामीजी यांनी चिककोडी तालुक्यातील हिरेकोडी मठा मधील स्वामींची हत्या निषेधार्य आहे अशा घटना कोणत्याही समाजात घडू नयेत याकरिता सरकारने आरोपींची चौकशी करून कठोर कारवाई करावी अशी मागणी केली.
त्यानंतर तेजाप्रती भीमपिठाचे हरीगुरु महाराज यांनी सुद्धा साधू संतांची हत्या करून जहादींनी विकृत केल्यास हिंदू धर्म नष्ट होणार नाही असे प्रतिपादन केले तसेच हिंदुत्वाच्या उभारण्यासाठी सर्वांनी एकत्रित येऊन हिंदू धर्माचे रक्षण करावे आणि सर्वत्र जनजागृती करावी असे आवाहन यावेळी या पत्रकार परिषदेत केले.
आर्थिक व्यवहारातून जैन मुलींची हत्या केल्याचे सांगण्यात येत आहे मात्र जैन मुनि अहिंसक असल्याने आर्थिक व्यवहार करू शकत नाहीत हा तपास वळसा घेत आहे त्यामुळे या प्रकरणाची तात्काळ उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी यावेळी सर्वांनी केली.
यावेळी या पत्रकार परिषदेत आणि स्वामींनी धर्मातर कायदा रद्द करण्याच्या सरकारचे निर्णयाने विरोध करण्यासाठी आलेले स्वामींवर प्राप्ती महामार्गावर अपघात झाला यामध्ये अपघातात अनेक जण मृत्यू झाले तसेच स्वामीदेखील गंभीर जखमी झाले. तर आता स्वामींची हत्या करण्यात आली.
त्यामुळे या प्रकरणाची योग्य ती कारवाई करून आरोपींना काठोरी शिक्षा द्यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली यावेळी केदारपिठाचे मुतनाळ शाखेतील शिवानंद शिवाचार्य स्वामीजी आनंदा करलिंगणावर रविराज सीमा हनुमनावर यांच्यासह अनेक जण उपस्थित होते.