हा रस्ता मृत्यूचा सापळा बनत असून: दुरुस्ती कडे मात्र प्रशासनाचे दुर्लक्ष
अनगोळ येथील मरगाई मंदिर ते संत मीरा शाळेपासून भाग्यनगर पर्यंतचा रस्ता पूर्णतः खराब झाला आहे.त्यामुळे या मार्गावरून येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना आपला जीव मुठत धरून जावे लागत आहे.
येथील रस्ता हा मृत्यूचा सापळा बनत असून याच्या दुरुस्तीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले असल्याने नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे.
तसेच येथील रस्ता बंद केला असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे त्याचबरोबरच ड्रेनेचे काम देखील झाले नसल्याने नागरिकांना येथून जाताना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
त्यामुळे एखादा अनर्थ घडण्यापूर्वीच प्रशासनाने या रस्त्याकडे लक्ष देऊन येथील रस्ता लवकरात लवकर दुरुस्ती करावा अन्यथा नागरिक रस्त्यावर उतरून आंदोलन छेडतील असा इशारा नागरिकांनी दिला आहे.