विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना डेंगू प्रतिबंधक लस केली देऊ
पावसाळ्याला सुरुवात झाली असल्याने विद्यार्थी आणि शिक्षकांच्या आरोग्याची काळजी घेण्याकरिता एंजल फाउंडेशन च्या वतीने आज सर्व विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना डेंगू प्रतिबंधक लस देऊ केली आहे.
येथील फुलबाग गल्ली मधील शाळा नंबर सात मध्ये विद्यार्थ्यांना डेंगू प्रतिबंधक लस देण्यात आली यावेळी एंजल फाउंडेशनच्या संस्थापिका अध्यक्ष मीनाताई बेनके यांच्या हस्ते सर्व विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना डेंगू प्रतिबंधात्मक लस देण्यात आली.
पावसाळ्यात शाळेच्या अवतीभवती पाणी साचले राहते यावर डासांचे पैदास मोठ्या प्रमाणात होते त्यामुळे ही गरज ओळखून घेऊन विद्यार्थ्यांचे शिक्षकांचे आरोग्य सुरक्षित राखण्याकरिता एंजल फाउंडेशनच्या वतीने सर्वांना डेंगू लस देण्यात आली आहे यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका शिक्षक विद्यार्थी त्यांच्यासह प्रज्ञा शिंदे सुमेधा परमेकर रेणुका पाटील सुप्रिया शिंदोळकर उपस्थित होत्या.
ewwsoa