बेपत्ता जैन मुनिंचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना हिरेकूड येथे घडली आहे. जैन मुनि आचार्य 108 काम कुमार नंदी महाराज स्वामी यांचा संशयास्पद मृत्यू झाला आहे ही घटना शुक्रवारी रात्री उघडकीस आली आहे
सदर जैन मुनिस्वामी बेपत्ता झाल्याची तक्रार चिकोडी पोलिस स्थानकात करण्यात आली होती त्यानंतर जैन मुनींचा खून करून मृतदेह फेकून देण्यात आल्या असल्याचे संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. दोन दिवसापूर्वी मठातून स्वामी बेपत्ता झाले होते त्यानंतर त्यांच्या भक्तांनी शोध मोहीम राबविली मात्र ते सापडले नाहीत.
त्यामुळे त्यांनी चिकोडी पोलीस स्थानकात स्वामी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली त्यानुसार पोलिसांनी तपास करत शुक्रवारी रात्री त्यांचा मृतदेह शोधून काढला यावेळी त्यांच्या मृतदेहावर जखमा आढळून आल्या त्यामुळे त्यांचा संशयास्पद मृत्यू चा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
हिरेकुडी मठ परिसरात मोठ्या प्रमाणात सध्या पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून नेमका स्वामींचा मृत्यू कशामुळे झाला किंवा त्यांचा कोणी घात केला याचा तपास पोलीस करत आहेत.