महापालिका स्थायी समिती अध्यक्ष प्रक्रिया बिनविरोध पार
आज महानगरपालिकेत महापालिका स्थायी समिती अध्यक्ष प्रक्रिया बिनविरोध पार पडली यावेळी चार पैकी तीन स्थायी समित्यांवर महिला नगरसेवक अध्यक्षपदी विराजमान झाल्या.
यामध्ये अर्थ स्थायी समिती अध्यक्षपदी विना विजापुरे आरोग्य स्थायी समिती अध्यक्षपदी रवी धोत्रे बांधकाम स्थायी समिती अध्यक्षपदी विना जोशी तर लेखा स्थायी समिती अध्यक्षपदी सविता पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
यावेळी अध्यक्षांची निवड झाल्यानंतर महापौर शोभा सोमनाचे यांनी पुष्पगुच्छ देऊन अध्यक्षांचे अभिनंदन केले. अध्यक्षपदाची निवड प्रक्रिया सकाळी 11 वाजता उपमहापौर आणि महापौर यांच्या उपस्थितीत पार पडली.
याप्रसंगी माजी आमदार अनिल बेनके आणि मनपा आयुक्त अशोक दुडगुंटी उपस्थित होते. याप्रसंगी आमदारांनी आपले मनोगत व्यक्त करताना असे म्हणाले की स्थायी समितीच्या अध्यक्षांची निवड बिनविरोध झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
तसेच सर्व नगरसेवकांच्या सहकार्यामुळे हे घडले असून सर्वांच्या साथीने बेळगाव शहर स्वच्छ सुंदर व्हावे यासाठी आमचा प्रयत्न असणार असल्याचे सांगितले.