*_शाळा नंबर 5 चव्हाट गल्ली येथे गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने गुरुवंदना कार्यक्रम साजरा करण्यात आला_*
येथील मराठी शाळा क्रमांक 5 येथे सोमवार (ता.3) रोजी गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने गुरुवंदना कार्यक्रम साजरा करण्यात आला. आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री रवी नाईक होते. यावेळी सर्व मान्यवर व शिक्षकांचे विदयार्थ्यांच्या तर्फे पाद्यपूजा व वंदन करण्यात आले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी त्यांच्या पालकांचे पाद्यपूजन करून त्याना वंदन केले नंतर शाळेतून बदली झालेल्या पोवार सरांचा माजी विद्यार्थी संघटना आणि शिक्षकांच्या तर्फे विशेष सत्कार करण्यात आला. पोवार सर यांनी बोलताना आपल्या शैक्षणिक वाटचालीमध्ये सहभागी सर्वांचे आभार मानले या शाळेत आपल्याला मिळालेल्या प्रेमामुळे शाळेला कदापी विसरू शकणार नाही याची ग्वाही दिली.
दीपक किल्लेकर यांनी पोवार सरांच्या कार्याचा आढावा घेत त्यांच्या सकारात्मक वृत्तीबद्दल गौरवोदगार काढले व भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. मुख्याध्यापक मुचंडीकर यांनी पोवार सर यांनी शाळेत खूप महत्वाचे काम केले आहे तसेच त्यांनी आज पर्यंत कोणत्याही कामासाठी सदैव तत्पर असतं, त्यांची अनुपस्थिती शाळेला कायम जाणवत राहील असे उदगार काढले. अध्यक्षीय भाषणात रवी नाईक सर यांनी देखील गुरुपौर्णिमेचे महत्व सांगून पोवार सर यांच्या कार्याचा आढावा घेतला. तसेच शाळेत या नुकत्याच नेमणूक झालेल्या हरिजन सरांचे स्वागत करण्यात आले. आजच्या कार्यक्रमास श्रीकांत कडोलकर तसेच पालक वर्गाची उपस्थिती उल्लेखनीय होती.
प्रास्ताविक एच व्ही नाथबुवा यांनी केले. सूत्रसंचालन पी ए माळी तर आभार आर एन कांबळे यांनी मानले..