एस के ई सोसाइटी च्या जी एस एस पी यु काॅलेज आणि महाविद्यालयात गुरूपौर्णिमेचे आयोजन.
आज रोजी गुरूपौर्णिमेच्या निमीत्ताने विद्यार्थी आणि शिक्षक यांचे ॠणानूबंद ,आजच्या जीवनात गुरूचे महत्व,समाजाचा निर्माण करता,आदी विचारांचे मंथन करण्यात आले .यावेळी प्राचार्य एस एन देसाई यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत केले. तसेच भाषा विभाग मधून संस्कृत भाषा प्रा. अवधूत जोशी ,कन्नड प्रा. गुरुराज वालीकर, मराठीच्या प्रा.सोनाली, हिंदीच्या प्रा. जयश्री कनगुतकर यांनी आपले विचार मांडले,विद्यार्थी वर्गाने उत्कृष्ट प्रतिसाद दिला,
अध्यक्षीय स्थानावरून प्राचार्य मजकूर यांनी सर्व प्रथम आनंद व्यक्त केला कि आजचा हा दिवस माझ्यासाठी फार महत्त्वपूर्ण आहे,आज माझ्या बरोबर माझे शिष्य ही उपस्थित आहेत, आणि विद्यार्थी जीवनातून आपले भविष्य निर्माण केलेले माझे विद्यार्थी माझ्या बरोबर शिक्षक रूपाने बरोबर आहेत ही भाग्यची गोष्ट आहे विद्यार्थी वर्गाने सर्व शिक्षकाना पुष्प देऊन आपली गुरूश्रध्दा व्यक्त केली. सुत्रसंचालन प्रा. अनघा वैध आणि प्रा सोनाली यांनी केले.