जिल्हा शिक्षणाधिपदी पुन्हा ए बी पुंडलिक यांची नियुक्ती केली
बेळगाव जिल्हा शिक्षणाधिपदी पुन्हा एकदा सरकारने ए बी पुंडलिक यांची नियुक्ती केली आहे. बेळगाव जिल्हा शिक्षण अधिकारी म्हणून नियुक्त झालेले ए बी पुंडलिक यांना या अगोदरही बेळगावचे डी डी पी आय म्हणून काम केले होते तर आता पुन्हा एकदा सरकारने त्यांचीच नियुक्ती केली असल्याने त्यांच्यावर अभिनंदन असा वर्षाव होत आहे.
तसेच बेळगावचे गटशिक्षणाधिकारी बजंत्री यांची खानापूरला बदली करण्यात आली आहे त्यांच्या जागी बेळगावच्या नव्या गटशिक्षणाधिकारी म्हणून विद्या कुंदर्गी यांची नेमणूक करण्यात आली असून या पुढील कारभार त्या पाहणार आहेत.