प्रगतिशील लेखक संघ बेळगाव (कर्नाटक) शाखेचे अधिवेशन रविवारी
बेळगाव : प्रगतिशील लेखक संघ बेळगाव (कर्नाटक) शाखेचे अधिवेशन रविवार दि. २ जुलै रोजी भरणार आहे. गिरीश कॉम्प्लेक्सच्या शहीद भगतसिंग सभागृहात सकाळी १० वाजता अधिवेशनाच्या कामकाजाला सुरूवात होईल आणि दुपारी २ वाजता होईल. अधिवेशनाची सांगता होईल.
अधिवेशनाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ कादंबरीकार आणि प्रगतिशील लेखक संघाच्या महाराष्ट्र शाखेचे अध्यक्ष प्रा. जी. के. ऐनापुरे (सांगली) हे असतील. अधिवेशनाचे उद्घाटन ऍड. रवींद्र हळींगळी (जमखंडी) हे करतील. या अधिवेशनात विविध विषयावरील ठराव संमत केले जातील. गेल्या तीन वर्षात संघाने केलेल्या कार्याचा आढावा घेतला जाईल. तसेच ऑगस्ट महिन्यात जबलपूर येथे होणाऱ्या राष्ट्रीय अधिवेशनासाठी प्रतिनिधींची निवड केली जाईल. त्याचप्रमाणे पुढील तीन वर्षासाठी कार्यकारी मंडळ निवडले जाईल. या अधिवेशनात सहभागी होऊन अधिवेशन यशस्वी करण्याचे आवाहन प्रगतिशील लेखक संघाच अध्यक्ष प्रा. आनंद मेणसे यांनी केले आहे.
यावेळी प्रगतशील लेखक संघाचे अध्यक्ष ज्येष्ठ विचारवंत साहित्यिक प्रा. आनंद मेणसे, मधू पाटील, माजी महापौर ॲड नागेश सातेरी , भरत गावडे, कार्यवाह कृष्णा शहापूरकर , शिवलीला मिसाळे संदीप मुतगेकर, प्रा निलेश शिंदे, अर्जुन सांगावकर, अनील पाटील, सुभाष कंग्राराळकर आनंद कानविंदे, रोशनी उंद्रे, प्रा दत्ता नाडगौडा ॲड. अजय सातेरी, ॲड. सतिश बांदिवडेकर, सागर मरगानाचे, श्रीकांत कडोलकर, गायत्री गोणबारे, शामल तुडयेकर, लता पावशे, प्रभावती शहापूरकर, दीपिका जाधव, निलेश खराडे, श्री राऊत , चंद्रकांत मजूकर, अनिल आजगावकर, ॲड. सुधिर चव्हाण, प्रा मयूर नागेनट्टी, कीर्तीकुमार दोशी यासह कार्यकर्ते आणि प्रगतशील लेखक संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.
प्रगतिशील लेखक संघाच्या वतीने अधिवेशन, विशेष व्याख्यान आणि मार्गदर्शन शिबिर रामदेव गल्ली कार पार्किंग येथील गिरीश कॉम्प्लेक्स च्या शहीद भगतसिंग सभागृहात आयोजित करण्यात आला आहे रविवार दिनांक 2 जुलै 2023 रोजी सकाळी 10 वाजता कार्यक्रम सुरू होणार आहे. बेळगाव जिल्ह्यासह विविध भागातून प्राध्यापक शिक्षक रसिक विद्यार्थी पालक सामाजिक कार्यकर्ते आणि विविध संघटना चे सर्व पदाधिकारी सदस्य यांनी उपस्थित रहावे असे आवाहन माजी महापौर ॲड. नागेश सातेरी, प्रगतिशील लेखक संघाचे अध्यक्ष प्रा. डॉ. आनंद मेनसे, मधु पाटील , प्रा निलेश शिंदे, प्रा. अशोक आलगोंडी यांनी उपस्थित राहून या वैचारिक मेजवानीचा आनंद घ्यावा मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन केले आहे. कार्यक्रम वेळेत चालू होणार आहे तरी सर्वांनी नोंद घ्यावी ही विनंती.