लक्ष्मण मन्नुरकर यांचा सेवा निवृत्ती निमित्त सन्मान
बेळगाव येथील मराठा मंडळ पदवी महाविद्यालयाचे सुपरिडेंट लक्ष्मण मन्नुरकर हे आपल्या 38 वर्षाच्या सुदीर्घ सेवेतून निवृत्त झाले.लक्ष्मण मन्नुरकर यांची मराठा मंडळ संस्थेचे समर्पित सेवा निष्ठ व्यक्तीत्व म्हणुन ख्याती आहे. मराठा मंडळ महाविद्यालयात त्यांचा सेवा निवृत्ती निमित्त सन्मान समारंभ आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य जी.वाय. बेन्नाळकर होते.
कार्यक्रमाची सुरुवात डॉ. वृषाली कदम यांच्या ईशस्वनाने झाली. तद्नंतर लक्ष्मण मन्नुरकर यांच्या विषयी डॉ. डी. एम. मुल्ला यांनी आपले मनोगत व्यक्त केले. आपल्या सत्काराला प्रत्युत्तर देता लक्ष्मण मन्नुरकर यांनी सर्वांचे आभार मानले.
अध्यक्ष स्थानावरून बोलताना प्राचार्य जी. वाय. बेन्नाळकर म्हणाले की, महाविद्यालय आणि मराठा मंडळ संस्थेच्या प्रगतीसाठी अहोरात झटणारे व्यक्तित्व म्हणजेच लक्ष्मण मन्नुरकर. मन्नुरकरांच्या सहयोगाने मराठा मंडळ संस्था आज शैक्षणिक क्षेत्रात उत्तुंग भरारी करीत आहे. .
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रंथपाल सुरेखा कामुले यांनी केले. तर प्रा.आर एम.तेली यानी सर्वांचे आभार मानले. या कार्यक्रमाला मराठा मंडळ संस्थेचे सचिव भाऊ पाटील, प्राध्यापक आणि कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.