केंब्रिज इंटरनॅशनल शाळेमध्ये आषाढी एकादशी निम्मित पालखी सोहळा उत्साहात साजरा
टिचर काँलनी खासबाग येथील केंब्रिज इंटरनॅशनल शाळेमध्ये आषाढी एकादशी निम्मित पालखी सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी शाळेच्या प्रांगणात विठ्ठलाचे प्रतिमेचे व पालखीचे पुजन संस्थेचे चेअरमन मिलिंद भातकांडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका शाजिया जमादार यानी पालखीला आरती केले. शाळेतील के.जी. ते इयत्ता सहावीच्या मुलानी संत श्री तुकाराम, नामदेव, ज्ञानदेव रखुमाई, विठ्ठल, यांचे वेष परिधान केले होते. वारकरांचे वेष परिधान केलेले विद्दार्थी व नऊ वारी साडी नेसून डोक्यावर तुळशी वृंदावन घेतलेल्या विद्यार्थी त्यामुळे सर्व वातावरण भक्तिमय झाले होते. भगव्या पताका, गळ्यात टाळ कपाळी गंध आणि भजनात दंग झालेले बाल वारकरी सर्वांच्या आकर्षणांचे केंद्रबिंदू ठरले होते. विठ्ठल विठ्ठल जय हरि विठ्ठल, जय जय राम कृष्ण हरी असा जयघोष करत पालखी सोहळ्याला प्रारंभ झाला. हरिनामाच्या जयघोषात विठु नामाचा गजर करत ही पालखी शाळेच्या आवारात दुमदुमली जणु पंढरपुरच अवतरले असे भासले.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष श्री मिलिंद भातकांडे, मुख्याध्यापिका शाजिया जमादार उपस्थित होते. हा पालखी सोहळा यशस्वी होण्यासाठी शाळेतील शिक्षक पूनम मंगलाकर, पूजा कंट्या, कविता पोल, पिया रामचंदन, वृंदा कुलकर्णी यानी विषेश परिश्रम घेतले. तसेच शाळेतील सर्व शिक्षक वर्गाचे, कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभले.
गजाननराव भातकांडे शाळेमध्ये आषाढी एकादशी निम्मित पालखी सोहळा उत्साहात साजरा
गजाननराव भातकांडे शाळेमध्ये आषाढी एकादशी निम्मित पालखी सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी शाळेच्या प्रांगणात विठ्ठलाचे प्रतिमेचे व पालखीचे पुजन संस्थेचे चेअरमन मिलिंद भातकांडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ प्रेमलता पाटील यानी पालखीला आरती केले. शाळेतील के.जी. व इयत्ता पहिलीच्या मुलानी संत श्री तुकाराम, नामदेव,ज्ञानदेव रखुमाई, विठ्ठल, यांचे वेष परिधान केले होते. वारकरांचे वेष परिधान केलेले विद्दार्थी व नऊ वारी साडी नेसून डोक्यावर तुळशी वृंदावन घेतलेल्या विद्दार्थी त्यामुळे सर्व वातावरण भक्तिमय झाले होते. भगव्या पताका, गळ्यात टाळ कपाळी गंध आणि भजनात दंग झालेले बाल वारकरी सर्वांच्या आकर्षणांचे केंद्रबिंदू ठरले होते. विठ्ठल विठ्ठल जय हरि विठ्ठल, जय जय राम कृष्ण हरी असा जयघोष करत पालखी सोहळ्याला प्रारंभ झाला. हरिनामाच्या जयघोषात विठु नामाचा गजर करत ही पालखी शाळेच्या आवारात दुमदुमली जणु पंढरपुरच अवतरले असे भासले.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष श्री मिलिंद भातकांडे, मुख्याध्यापिका सौ प्रेमलता पाटील उपस्थित होते. हा पालखी सोहळा यशस्वी होण्यासाठी शाळेतील शिक्षक मॅथ्यू लोबो, स्वप्नील वाके, ज्योती मुंचडी, शामल पाटील, वैशाली बनवाण, संगिता सुतार माहेश्वरी, नफ़ीसा, रोशनी खातून यानी विषेश परिश्रम घेतले. तसेच शाळेतील सर्व शिक्षक वर्गाचे, कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभले.