This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

October 2024
S M T W T F S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  

| Latest Version 9.4.1 |

Local News

*जॉहननाथन फाउंडेशनने साजरा केला फादर्स डे*

*जॉहननाथन फाउंडेशनने साजरा केला फादर्स डे*

जॉहननाथन फाउंडेशनने साजरा केला फादर्स डे

बेळगाव : जॉहननाथन फाउंडेशन यांच्यावतीने फादर्स डे कार्यक्रम साजरा करण्यात आला. शहापूर मधील माऊंट कार्मेल चर्च मध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

फादर्स डे चे औचित्य साधून फाउंडेशन च्यावतीने येथील डी. पी स्कुल मध्ये ग्रीटिंग कार्ड बनविण्याची स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धेतील विजेत्यांना माऊंट कार्मेल चर्चमध्ये झालेल्या कार्यक्रमात बक्षीस वितरीत करण्यात आली.

मुझना पटेल, आराध्या निल्ले आणि क्रिस्टल डिसोझा यांनी आपल्याला गटात पहिला, उर्वा सय्यद, श्रेया लठ्ठे, शेर्ली डिसोझा आणि सरह अँथोनी यांनी आपल्याला गटात दुसरा तर मिष्का शहा, सोनाक्षी पाटील, ख्रिस्टन अँथोनी व अनुष्का गवळी यांनी आपापल्या गटात तिसरा क्रमांक पटकावला. आराध्या आठवले हिला उत्तेजनार्थ क्रमांक देण्यात आला.

या विजेत्यांना डीआर अँथोनी यासह अन्य मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देऊन गौरविण्यात आले. फाउंडेशनच्या सदस्या ऍना डिसोझा, लीना वेगस, भक्ती शिंदे, वेरोनीका रोड्रीग्ज, शारदा दिवटे यांच्या उपस्थितीत ही पारितोषिके वितरीत करण्यात आली.


Independent Journalism Can’t Be Independent Without Your Support, Contribute By Clicking Below.

D Media 24

Leave a Reply