राष्ट्रीय महामार्गांवर NWKRTC बसच्या भाड्यात 5-10 ₹ ने वाढ
राष्ट्रीय महामार्गांवर NWKRTC बसच्या भाड्यात 5-10 ₹ ने वाढ करण्यात आली आहे. ही भाडेवाढ हुब्बळी -गदग, हुबळी बेळगाव , हुबळी -हवेरी आणि इतर मार्गांवर लागू करण्यात आली आहे .जिथे बसेसना महामार्गाच्या वापरासाठी टोल भरावा लागतो.
भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) १ एप्रिलपासून टोलच्या दरात वाढ केली आहे, ज्यामुळे बस भाड्यात ही वाढ करण्यात आली आहे.विशेष म्हणजे या दरवाढीबाबत सरकार किंवा NWKRTC यांनी कोणतीही जाहीर घोषणा केलेली नाही. त्यामुळे शक्ती योजना सुरू केल्याने ही दरवाढ झाली आहे का, असा प्रश्न नागरिकांमध्ये निर्माण झाला आहे.
तथापि, NWKRTC मधील सूत्रांनी स्पष्ट केले आहे की NHAI ने टोल दरवाढीनुसार भाडे वाढवले आहे, ही वार्षिक दरवाढ आहे . निवडणुकीमुळे यंदा भाडेवाढ लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.