कर्नाटक उच्च न्यायालयाचे वरिष्ठ न्यायाधीश श्री जी नरेंद्र यांनी दिली बेळगांवला भेट
बेळगाव जिल्ह्याचे प्रशासकीय न्यायाधीश आणि कर्नाटक उच्च न्यायालयाचे वरिष्ठ न्यायाधीश श्री जी नरेंद्र यांनी काल बेळगाव येथील जिल्हा न्यायालयाला भेट दिली. भेटी प्रसंगी त्यांचा बार असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी यथोचित सत्कार केला.
यावेळी बार असोसिएशनच्या सदस्यानी जिल्हा न्यायालयात सर्वांगीण विकासाबाबत चर्चा केली याप्रसंगी माननीय जिल्हा न्यायाधीश बेळगाव व इतर न्यायाधीश त्याचबरोबर वार असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते.