विद्यार्थ्यांनी पारंपारिक वेशभूषा करून सर्वांचेच लक्ष वेधून घेतले
शहरातील भाऊराव काकतकर महाविद्यालयात पारंपारिक वेशभूषा विद्यार्थी दिसून आले. रोज महाविद्यालयीन ड्रेस मध्ये असणाऱ्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी आज वेगवेगळे वेशभूषा परिधान केले होते.
यावेळी मुलींनी साडी स्कर्ट परिधान केला होता तर मुलांनी देखील साउथ इंडियन स्टाईल नेम खांद्यावर टॉवेल, लुंगी ,काळा शर्ट आणि डोळ्यावर चष्मा घालून सर्वांचे लक्ष वेधून घेतले..
यावेळी पारंपारिक दिवशी पारंपारिक कपडे परिधान करून लक्ष वेधणाऱ्या विद्यार्थ्यांचे जल्लोषात आणि उत्साहाला शिक्षकांनी देखील साथ दिली.
सकाळी कॉलेजचा संपूर्ण परिसर विद्यार्थ्यांनी परिधान केलेल्या वेगवेगळ्या कपड्यांनी सजला होता. तर तरुणींचा जल्लोष यावेळी वेगळाच पाहायला मिळाला.