गेले अनेक दिवस हुलकावणी दिलेल्या मान्सूनने बेळगावात अखेर शनिवारी दुपारी हजेरी लावली.
गेल्या दोन दिवसापासून वातावरण पावसाळी झाले होते पण पाऊस काही पडला नव्हता.जून महिना संपत आला तरी पावसाचा पत्ता नसल्याने बळीराजाची चिंता वाढली होती.पण अखेर पावसाने हजेरी लावल्याने सर्वसामान्य जनता देखील आनंदित झाली आहे.
शनिवारी आठवडी बाजाराचा दिवस असल्याने बाजारात खरेदीसाठी लोकांनी गर्दी केली होती पण अचानक सुरू झालेल्या पावसामुळे भाजी विक्रेते आणि खरेदीसाठी आलेल्या लोकांना आसरा शोधायची वेळ आली.उशिरा का होईना पावसाने हजेरी लावल्याने दुबार पेरणीचे संकट टळले आहे.