सरकारी मराठी मुला मुलींची शाळा नंबर 25 येथे 1997-98 च्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा संपन्न
बेळगाव: सरकारी मराठी मुला मुलींची शाळा नंबर 25 गोवावेस बेळगाव या शाळेतील 1997 ते 98 सालच्या सातवी पास झालेल्या माजी विद्यार्थ्यांनी आपल्या रोप्य महोत्सव अवचित साधून स्नेह मेळावा केला.
या स्नेह मेळाव्याला 1997-98 या सालच्या सातवी पास झालेल्या सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींनी तसेच या बॅचला शिकवलेल्या शिक्षक हेमलता कानडे टीचर, गोविंद कुमार सर ,बळीराम कानशिडे सर तसेच आज शाळेत सेवा बजावत असलेले आर डी बचनेट्टी सर ,एस पी मोडक टीचर उपस्थित होते.
या समयी माजी विद्यार्थीनी सर्व शिक्षकांना पुष्पवृष्टी करून मोठ्या सन्मानाने आत नेऊन सर्व शिक्षकांना व्यासपीठावर बसून शाल व श्रीफळ व मानचिन्ह देऊन सत्कार केला.
या कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने करण्यात आली. तसेच शाळेचे दिवंगत शिक्षक व दिवंगत माजी विद्यार्थी यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर प्रत्येक विद्यार्थ्याने आपला परिचय तसेच आपण करत असलेल्या व्यवसाय सांगितले. त्यानंतर शिक्षिकांनी या बॅचच्या विद्यार्थ्याबद्दल आपले मनोगत व्यक्त केले .तसेच 1997-98 च्या सर्व विद्यार्थ्यांनी शाळे बद्दल तसेच आपल्या गुरुजींना बद्दल आपले मनोगत व्यक्त केले. माजी विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त करताना पंचवीस वर्षांपूर्वी शिक्षक कशा पद्धतीने शिकवत होते. शिक्षणासाठी शिक्षक कशाप्रकारे छोट्या छोट्या शिक्षा द्यायचे हे सांगून जुन्या आठवणींना उजाळा दिला. त्यानंतर सर्व माजी विद्यार्थ्यांनी लहानपणीचे छोटे छोटे खेळ खेळून पुन्हा शाळेत गेल्याचा आनंद लुटला तसेच सर्वांनी स्नेहभोजनाचा आस्वाद घेतला.