चवाट गल्लीतील रहिवाशांच्या कडून वरुणराजाला साकडे
लक्ष्मी टेकडीवर पूजा-अर्चा; पावसासाठी मंगळवारी दुपारी चार वाजता चवाट गल्लीतील रहिवाशांच्या कडून वरुणराजाला साकडे घालण्यात आले.
जून महिना कोरडे गेल्याने सीमाभागात चिंतेचे ढग निर्माण झाले असून शेतकऱ्यांचे डोळे आभाळाकडे लागले आहेत. काही वर्षांपूर्वी रोहिणी आणि मृग नक्षत्रात सरासरी पर्जन्य वृष्टी होत असल्याने या दिवसांत मशागत पूर्ण होऊन पेरणीची तयारी सुरु होत होती. तथापी, यंदा रोहिणी आणि मृग दोन्ही नक्षत्रांनी वाकुल्या दाखवल्याने मशागतही लांबली आणि पेरण्याही खोळंबल्याने शेतकरीवर्ग चिंताग्रस्त झाला आहे.
जुन महिना संपत आला तरी सीमाभागातील, शेतकरी अजूनही पावसाची वाट पहात आहे.
सीमाभागात धोधो पाऊस पडू दे, बळीराजाला सुखी, समाधानाचे दिवस येवू दे, धनधान्याने घर भरू दे तसेच शेतमालाला दर मिळून शेतकरी राजा समाधानाने जगू दे” असे साकडे चवाट गल्लीतील ज्योतिर्लिंग देवदादा सासणकाटीच्या व चवाट गल्लीतील नागरिकांच्या कडून मंगळवारी सायंकाळी 4 वाजता लक्ष्मी टेकड येथील श्री लक्ष्मी, मंदिरात पूजा व आरती करून पावसासाठी वरूणराजला साकडे घालण्यात आले. यावेळी चवाट गल्लीतील पंच प्रताप मोहिते यांनी विधिपूर्वक पूजन करून अकरा मुलींची ओटी भरून वरुणराजाला साकडे घालण्यात आले यानंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले यावेळी उपस्थित लक्ष्मण किल्लेकर, उत्तम नाकाडी, लक्ष्मण नाईक,सुनील जाधव,अमर यळूरकर,दिंगबर पवार,भाऊ नाईक, प्रवीण धामणेकर, चंद्रकांत कंणबरकर,अनंत बामणे, बाबू मोहिते, किसन रेडेकर, प्रवीण जाधव, श्रीनाथ पवार संदीप मोहिते विश्वास धुराजी, गिरीश पाटील, यासह गल्लीतील महिला व नागरिक उपस्थित होते.