KSRP युनिट 2 रे येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा
आंतरराष्ट्रीय योग दिनाचा एक भाग म्हणून कुमारी जैनाबा दखनी योग शिक्षक आणि माधवबाग इन्स्टिट्यूट यांच्या संयुक्त विद्यमाने KSRP 2 युनिट बेळगाव येथे आज योगासने करण्यात आली. तसेच माधवभा संस्थेतर्फे मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली .
यावेळी डॉ.प्रसाद एम. देशपांडे यांनी आहार, आणि विचार संतुलित ठेवा तसेच आरोग्य राखण्यासाठी तांदूळ, मीठ, साखर, मैदा यांचे सेवन माफक प्रमाणात करा या विषयावर व्याख्यान दिले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हमजा हुसेन कमांडंट द्वितीय फोर्स यांनी योगाचे महत्व सांगितले यावेळी दलातील सर्व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.