मराठा मंडळ पदवी महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा
बेळगाव येथील मराठा मंडळ कला, वाणिज्य, विज्ञान आणि गृहविज्ञान महाविद्यालयाच्या छत्रपती शिवाजी क्रीडांगणावर नवाँ आंतरराष्ट्रीय योग दिन महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण प्रा. राजू हट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला.या समारंभाला अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य जी.वाय. बेन्नाळकर उपस्थित होते.
प्रारंभी ग्रंथपाल एस. सी. कामुले यांनी सर्वयोग शिबिरार्थांचे स्वागत केले. तद् नंतर प्रा. राजू हट्टी यांनी योगासना विषयी सविस्तार माहिती दिली. अध्यक्ष स्थानावरून बोलताना प्राचार्य जी.वाय. बेन्नाळकर म्हणाले की, दिननित्य जीवनात योग आणि ध्यान साधना केल्याने शरीर आणि मन सदृढ व समाधानी राहते. आजच्या आधुनिक काळामध्ये योगासनाला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे.
या कार्यक्रमाला प्रा.जी.एम.कर्की, डॉ. डी. एम.मुल्ला, डॉ.एच.जे.मोळेराखी, प्रा.आरती जाधव, डॉ. वृषाली कदम, प्रा. अर्चना भोसले,डॉ. गिरजाशंकर माने, प्रा. एस.आर नाडगौडा, प्रा. कदम, प्रा.सोनाली पाटील, प्रा एम.जी. पाटील, प्रा.भाग्यश्री रोकडे आणि विद्यार्थी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. कार्यक्रमाच्या शेवटी प्रा. जगदीश येळ्ळुर यांनी सर्वांचे आभार मानले.