बेळगाव, ( तारीख, 18 जून 2023 ) : मराठी भाषेत निर्माण केल्या गेलेल्या मौखिक आणि लिखित स्वरूपातील साहित्याला मराठी साहित्य म्हणतात. इतर भाषांशी तुलना केली असता काही साहित्य प्रकार हे फक्त मराठीत आढळून येतात असे दिसते. उदा. ओव्या, अभंग, कीर्तन पोवाडे, लावण्या, इत्यादी. ग्रीस आणि रोम . अथेन्स शहर-राज्यातील एक विशिष्ट कला प्रकार म्हणून थिएटरची पहिली ओळख बीसीई 534 मध्ये केली जाऊ शकते, जेव्हा शोकांतिकेच्या स्पर्धेत प्रथम पारितोषिक देण्यात आले होते.
प्राचीन काळातील नाटय प्रकार ग्रीसच्या थिएटरमध्ये तीन प्रकारच्या नाटकांचा समावेश होता: शोकांतिका, विनोदी आणि सत्यर नाटक . एथेनियन शोकांतिका – शोकांतिकेचा सर्वात जुना जिवंत प्रकार – हा नृत्य-नाटकाचा एक प्रकार आहे जो शहर-राज्याच्या नाट्य संस्कृतीचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे.मराठी संगीत नाटक ही मराठी रंगभूमीने जागतिक रंगभूमीला दिलेली देणगी आहे, असे मानले जाते. विष्णूदास भावे यांनी मराठी रंगभूमीचा श्रीगणेशा केला तर संगीत नाटकाचा लौकिक अर्थाने प्रारंभ अण्णासाहेब किर्लोस्कर यांच्या संगीत शाकुंतल (१८८०) या नाटकाने झाला. त्यानंतर सौभद्र, रामराज्यवियोग, द्रौपदी, विद्याहरण, शारदा, स्वयंवर, मानापमान, संशयकल्लोळ, एकच प्याला …अशा संगीत नाटकांची परंपराच निर्माण झाली. १८८० ते १९३० हा संगीत नाटकांच्या आणि पर्यायाने नाट्यसंगीताचा सर्व अर्थांनी सुवर्णकाळ होता.
गायिका प्रा डॉ स्नेहा राजुरीकर यांनी संन्यास्य खडग या नाटकातील हे गीत *”मर्म बंधातली ठेव ही प्रेममय ठेवी जपोनी सुखाने दुखवी जीव”*, आणि *उगवला चंद* यांनी हे गीत गाईले.
गायिका आणि संगीतकार के एल ई स्कूल ऑफ म्युझिक बेळगावच्या ज्येष्ठ गायिका आणि विचारवंत साहित्यिका प्राचार्य डॉ दुर्गा नाडकर्णी यांनी *ययाती नाटकातील* *”चंद्रिका ही जणू ठेवी या तस्कर मानोनी हे मान अपमान”* , आणि देवयानी नाटकातील *” यती मन मम मानितल्या एकल्या नृपाला आधी अंत ज्यास नसे त्या सनातनाला””* हे गीत गाईले.
प्रा संगीता बांदेकर यांनी ” गो. ब. देवल लिखित संशय कल्लोळ या नाटकातील हे गीत *मजवरी तयांचे प्रेम खरे पहिले जडली ती उरे कासास लावूनी पाहिले”* हे गीत गाईले. प्रा संगीता बांदेकर यांनी ” गो. ब. देवल लिखित संशय कल्लोळ या नाटकातील हे गीत *मजवरी तयांचे प्रेम खरे पहिले जडली ती उरे कासास लावूनी पाहिले”* हे गीत गाईले.
ज्येष्ठ संगीतकार आणि विचारवंत प्रा डॉ. पंडित राजाराम आंबर्डेकर यांनी *”हे सुरांनो चंद्र व्हा चांदण्याचे कोश माझ्या प्रियकरा लागो वाटेत ठरविले माणसांची बरसूनी आभाळ सारे अमृताने”* आणि शेवटी भैरवी रागात *” कैवल्यांच्या चांदण्याला भुकेला चकोर रे, चंद्रभागा पांडुरंगा मन करा थोर रे, बालपणी खेळी रंगलो तारुण्य नासले , वृद्धपने देवा आता दिसे पैलतीर, जन्म मरण नको आता रे , मरण न घोर नको येरझार “* यांनी गीत गायन केले.
स्वागत व ईशस्तवन हे गीत कार्यक्रमाच्या प्रारंभी कोरस आवाजात सर्व कलाकारांनी गायीले. संगीतकार अनिमिष हेगडे यांनी *”प्रिये पहा ” आणि “रवी मी “* , सुजाता हुच्चेनट्टी यांनी ” ऋतुराज “, प्रा. योगेश रामदास यांनी *”मुरलीधर श्याम “* आणि *” नभ मेघाने “*
सौभद्र संगीत नाटकातील हे गीत *””वध जाऊ कुणाला शरण, करील जो हरण संकटाचे, मी धरीन चरण त्याचे “”* हे गीत गायन केले. अशा विविध शास्त्रीय संगीत नाटकातील गीतांच्या बहारदार सादरीकरणामुळे अंतकरणाला शोधून जातील अशा जाणिवांची गीते रसिक प्रेक्षकांच्या काळजात जाऊन भिडणारी गीते प्रेक्षकांनी उचलून धरली हवी तिथे दाद देऊन कलाकारांना प्रोत्साहन दिले नवनवीन गीतांच्या विविध ढंगात सादर केलेल्या गीतामुळे रसिक मंत्रमुग्ध झाले.
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा बेळगांव आणि कन्नड सांस्कृतीक भवन बेळगांव यांच्या संयुक्त विद्यमाने शास्त्रीय संगीत गीत गायनांचा कार्यक्रम आयोजित नाट्य महोत्सव च्या सांगता कार्यक्रम शुक्रवार दिनांक 16 जून 2023 रोजी रामदेव हॉटेल शेख होमिओपॅथी महाविद्यालयाच्या समोरील कन्नड सांस्कृतिक भवन नेहरूनगर बेळगाव येथे नुकताच कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या अध्यक्षा विना लवकर होत्या.
स्वागत व प्रास्ताविक आरपीडी महाविद्यालयाच्या माजी मराठी विभाग प्रमुख संध्या देशपांडे यांनी केले.
गायक आणि गायिका के एल ई स्कूल ऑफ म्युझिक बेळगावच्या ज्येष्ठ गायिका आणि विचारवंत साहित्यिका प्राचार्य डॉ दुर्गा नाडकर्णी, निवेदक आणि सूत्रसंचालन प्रा डॉ राजेंद्र भांडणकर, गायिका प्रा डॉ स्नेहा राजुरीकर, प्रा डॉ.पंडितराजाराम आंबर्डेकर, प्रा.संगीता बांदेकर, अनिमिष हेगडे, प्रा. योगेश रामदास, सुजाता हुंच्चेनट्टी, स्वाती हुद्धार, तबलावादक साथ राहुल मंडोळकर हार्मोनियम वादक साथ भक्ती आंबर्डेकर ऑर्गन वादक साथ यादवेंद्र पुजारी, ताल व झांजवादकची साथ जितेंद्र साबणावर यांनी साथ दिली. यावेळी शंकर चौगुले, अनिल चौधरी, गीता कित्तूर, प्रा निलेश शिंदे, श्रीधर कुलकर्णी, चित्रा यल्लुर, अजित पाटील, कीर्ती टेंबे, शकिरा सय्यद, कुमुद शहाकर, प्रा. ए. एस गोडसे, प्रा. पी. एस. पाटील, वर्षा चव्हाण, विजय पाटील, मानसी भातकांडे , श्रीधर पाटील, आनंद गाडगीळ, विनय जठार, अनिल पाटील, डॉ. संजीवनी खंडागळे, प्रकाश फडणीस, अनिल कागल, प्रा. एस आर. माडिबोने, शिल्पा बोगरे, विशाल पाटील, विशाल चौगुले, लक्ष्मण बांडगे, शर्मिला प्रभू, सुधीर लोहार, नागराज पाटील, आरती पाटोळे, आसावरी कुलकर्णी, नारायण पाटील, सुमा राव, चित्रा क्षीरसागर, रेश्मा मुचंडीकर, सागर गुंजीकार, प्रज्वल सुतार, आकाश बाडीवाले, गुरूसिध्छाया हिरेमठ, अंजली चितळे, निखिल भातखांडे, रजनी रायकर, उदय पाटील, प्रकाश खैर, अजित पाटील, मोहन कुलकर्णी, प्रणिता खरात, मेघश्री श्रीशेट्टी , प्रा. मेघा जाधवतसेच संस्थेचे पदाधिकारी सदस्य कर्मचारी विद्यार्थी पालक शिक्षक प्राध्यापक रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.