पत्नीच्या हत्येचा रचला कट
बेळगाव जिल्ह्यातील चिकोडी येथे सचिन रायमाने यांनी आपल्या पत्नीच्या हत्येचा कट रचला होता. त्याने गेल्या पंधरा दिवसांपूर्वी घटस्फोट घेतलेल्या पत्नीचे लग्न बाह्य संबंध असल्याचा संशय व्यक्त करून तिला मारण्याचे कट रचला.यासाठी त्यांनी सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील कुपवाडा गावात पिस्तूल विकत घेतली.
हे पिस्तूल घेऊन तो मिरज रेल्वे स्थानकावर संशयास्पद फिरत असल्याची माहिती मिळाल्यानंतर मिरज पोलिसांनी त्याला अटक करून कारवाई केली आणि त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पत्नीच्या हत्येचा कट रचणारा सध्या पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. तसेच त्याला पोलिसांनी अटक करून गुन्हा दाखल केला आहे. गेल्या पंधरा दिवसापूर्वी त्याची पत्नी हर्षिता हिने चिकोडी पोलीस स्थानकात आपल्या जीवाला धोका असल्याची तक्रार दाखल केली होती त्यानुसार पोलिसांनी ही कारवाई करत त्याच्यावर गुन्हा दाखल केला