या योजनेमुळे राज्यातील परिवहन मंडळे नफ्यात येतील
स्त्रीशक्ती योजनेमुळे राज्यातील महिलांना मोफत बसप्रवासाची सुविधा उपलब्ध झाली आहे. योजनेचे नियोजन व्यवस्थित झाले आहे. या योजनेमुळे राज्यातील परिवहन मंडळे नफ्यात येतील तसे झाल्यास परिवहन मंडळांची स्थिती सुधारेल, कर्मचाऱ्यांचे वेतनही वाढविता येईल असा आशावाद सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांनी व्यक्त केला. आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्रसारमाध्यमांशी बोलताना मंत्री सतीश जारकीहोळी वरील प्रतिपादन केले.
त्यानंतर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की पावसाला विलंब झाल्याने बेळगावात आणि उत्तर कर्नाटकात पाणीसमस्या तीव्र होत आहे या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राकडे आणखी पाणी मागणार का या प्रश्नावर, तशी वेळ आता येणार नाही असे वाटते. कारण येत्या आठवड्याभरात पावसाला सुरवात होण्याची अपेक्षा आहे. त्यानंतर ही समस्या राहणार नाही असे सांगितले .
तसेच वाढीव वीजबिले कोणत्या आधारावर देण्यात येत आहेत याची माहिती घेऊन त्यावर बोलेन असे स्पष्टीकरणही त्यांनी यावेळी दिले.कोणत्या आधारावर दुप्पट-तिप्पट बिले देण्यात येत आहेत याची नेमकी माहिती आपल्याला नाही. ती घेऊन यावर काय ते बोलेन असे मंत्री जारकीहोळी यांनी सांगितले.
वीज दरवाढ ही नियमित प्रक्रिया आहे. वीज नियामक आयोगाने दरवाढीला एप्रिलमध्ये परवानगी दिल्याची माहिती आहे. कदाचित निवडणुकीमुळे दरवाढ लगेच अमलात आणली गेली नसावी. विजेची समस्या केवळ कर्नाटकातच नव्हे तर संपूर्ण देशातच आहे. दरवाढीची समस्या तात्पुरती आहे. ती निकाली निघेल असे देखील सांगितले