गांजा विक्री करणाऱ्या दोघांना अटक
हत्तरगी टोल नाक्या जवळील हंचीनाळ गावच्या हद्दीत बेकायदेशीरपणे गांजा विक्री करत असताना महाराष्ट्रातील दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.तसेच त्यांच्याकडून सहा लाख किमतीचा चार किलो 180 ग्रॅम गांजा आणि वाहतुकीसाठी वापरलेली मोटरसायकल जप्त करण्यात आली आहे.
राष्ट्रीय महामार्गालगत हुककेरी तालुक्यात जवळील एका गावात गांजा विक्री करत असताना साहेबराव विश्वनाथ पलिके वय 50 राहणार हळदाईवाडी तालुका सांगोला आणि पुरुषोत्तम रामचंद्र कौलगी वय 42 राहणार पंढरपूर जिल्हा सोलापूर अशा दोघांना अटक केली आहे.
याप्रकरणी बेळगाव जिल्हा सीएन गुन्हे पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून या मोहिमेत पोलीस निरीक्षक बी आर गडेकर डीसीआरबी चे एम एस आय टी के कोळची एन एम गायकवाड यांनी सहभाग घेऊन आरोपींना अटक केली आहे.