वीज दरवाढी विरोधात युवा समितीचे आंदोलन
अचानक घरगुती आणि व्यावसायिक वीज दरात वाढ करण्यात आली आहे आणि त्याची वाढीव बिले ग्राहकांना दिली जात आहेत. दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिकांवर आर्थिक बोजा पडणार आहे.
तसेच व्यावसायिक दरवाढीमुळेही वस्तूंच्या किमती वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे आज महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने व्यवस्थापकीय संचालक हुबळी विद्युत पुरवठा कंपनी लिमिटेड ,हुबळी विद्युत पुरवठा कंपनी लिमिटेड च्या माध्यमातून अधीक्षक अभियंता यांना वीज दर वाढ मागे घेण्यासंबधी निवेदन देण्यात आले.
यावेळी युवा समितीने वाढीव शुल्क आकारणीचा निर्णय मागे घेण्यात यावा आणि अतिरिक्त FAC (इंधन समायोजन शुल्क) देखील आकारण्यात येत आहे. वीज दरवाढीचा निर्णय घ्यावा ताबडतोब मागे घ्यावा अन्यथा बेळगावातील नागरिकांच्या वतीने आंदोलन पुकारण्यात येईल. असा इशारा देण्यात आला.