This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

November 2024
S M T W T F S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930

| Latest Version 9.4.1 |

EducationLocal News

*जिद्द, चिकाटी असेल तर कोणतेही यश अशक्य व कठीण नाही : आयएएस ज्योती यरगट्टी* 

*जिद्द, चिकाटी असेल तर कोणतेही यश अशक्य व कठीण नाही : आयएएस ज्योती यरगट्टी* 
D Media 24

*जिद्द, चिकाटी असेल तर कोणतेही यश अशक्य व कठीण नाही : आयएएस ज्योती यरगट्टी*

 

*द.म.शि. मंडळ,ज्योती करियर अकॅडमी, बी. के व ज्योती कॉलेज, वायसीएमयू व माजी विद्यार्थी संघटनेतर्फे आय ए एस परीक्षेत उत्तीर्ण झालेली श्रुती येरगट्टी, नाझिया पटवेगार, प्रतीक्षा पाटील, प्रकाश पाटील यांचा सन्मान सोहळा , मार्गदर्शन शिबिर आणि व्याख्यान संपन्न*

बेळगाव , तारीख ( 05 जून 2023 ) : अपयश आले तरी खचून न जाता खडतर प्रयत्न केल्याने यश नक्कीच मिळते. अपयशाची भीती नको यश हमखास मिळते. वेळेचे नियोजन आणि अभ्यासाची सांगड अत्यंत महत्त्वाची आहे. पण ग्रामीण प्रदेशामध्ये शिकत आहोत याची मनात खंत न बाळगता जिद्दीने ध्येय गाठण्यासाठी अथक परिश्रम घ्यावे. कोणतेही क्षेत्र कमी नसून त्यामध्ये यशस्वी होण्याकरिता वाटचाल करावी; कोणत्याही प्रकारचा न्यूनगंड मनात न बाळगता अविरत प्रयत्न करत राहिले गेले पाहिजे.

गेल्या काही दशकात केंद्रीय स्पर्धा परीक्षा क्षेत्रात (UPSC, SSC, Railway , NTPC, Banking) क्त उत्तर भारतीय विद्यार्थ्यांची मक्तेदारी होती. परंतु अलीकडच्या काळात ही मक्तेदारी मोडून काढत महाराष्ट्र आणि कर्नाटकाच्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी या क्षेत्रात अभूतपूर्व यश संपादन करत दिल्लीचे तख्त गाजवले आहे. स्पर्धा परीक्षा क्षेत्रातील संधींबद्दल ग्रामीण भागात होत असलेली जनजागृती, नागरी सेवेच्या माध्यमातून मिळणारी पदे, प्रतिष्ठा तसेच विविध आव्हाने झेलत समाजसेवेचा वारसा अविरतपणे पुढे चालवण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती, इंटरनेट व त्यांच्याशी संलग्न अनुप्रयोगाच्या माध्यमातून भौतिक अडथळे दूर होऊन दिल्ली, पुणे , बेंगलोर हैदराबादमधील दर्जेदार अभ्यास साहित्याची उपलब्धता; तसेच प्रशासकीय सेवेमध्ये मिळणारी प्रतिष्ठा, त्याभोवती असणारे आकर्षण, त्यायोगे मिळणारी समाजप्रतिष्ठा व नवोदित अधिकारी मंडळींनी वास्तवाशी गल्लत करत आपल्या भाषणाच्या माध्यमातून मांडलेली एकांगी यशोगाथा आदी गोष्टींमुळे गेल्या काही दशकात ग्रामीण भागातील विद्यार्थी स्पर्धा परीक्षा क्षेत्राकडे आकृष्ट झाले आहेत आणि ही निश्‍चितच स्वागतार्ह बाब आहे. प्रशासकीय सेवेत जाण्यासाठी आपल्याला देशातील कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी आणि वयोमान 21 वर्षे पूर्ण असणे गरजेचे असते. जिद्द, चिकाटी, आत्मविश्वास, प्रयत्न, सातत्य, कष्ट, सहनशीलता, ध्येय आणि शेवटी यश या सर्व गोष्टी केवळ अधिकारी होण्याकरिताच लागू होतात. स्पर्धा परीक्षा क्षेत्रामध्ये विविध संधी उपलब्ध असल्या तरी या क्षेत्रात दुर्दैवाने अपयश आल्यास खचून न जाता सर्वांनी एवढे लक्षात ठेवायला हवे, की स्पर्धा परीक्षा हे एकमेव क्षेत्र नाही. तसेच स्पर्धा परीक्षा क्षेत्राची तयारी करताना प्राप्त झालेले ज्ञान, वैचारिक प्रगल्भता, संयमीपणा, तर्कनिष्ठ बोलणे, अनुभव आदी गोष्टींच्या जोरावर आपण इतरही क्षेत्रात देदिप्यमान यश संपादन करू शकतो. असे प्रतिपादन आयएएस परीक्षा उत्तीर्ण झालेल्या श्रुती येरगट्टी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना केले.

दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ बेळगांव आणि ज्योती करियर अकॅडमी बेळगाव, भाऊराव काकतकर महाविद्यालय बेळगाव, ज्योती पदवी पूर्व महाविद्यालय बेळगाव, वाय. सी. एम. यु . आणि माजी विद्यार्थी संघटना बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयएएस 2023-24 परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या परीक्षार्थींचा सत्कार-सन्मान सोहळा आणि मार्गदर्शन शिबिर, आणि व्याख्यानाचे आयोजन असा संयुक्त कार्यक्रम सोमवार दिनांक 5 जून 2023 रोजी सकाळी 11 वाजता भाऊराव काकतकर महाविद्यालयाच्या सभागृहात संपन्न झाला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळचे उपाध्यक्ष आणि साप्ताहिक राष्ट्रवीरचे ज्येष्ठ संपादक, महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते व मार्गदर्शक सल्लागार *ॲड. राजाभाऊ पाटील* उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रारंभी वृक्षाला पाणी घालून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला काय कार्यक्रमाला चालना दिली. व्यासपीठावर

याप्रसंगी आयएएस परीक्षेत उत्तीर्ण झालेले बेळगाव जिल्ह्यातील मुडलगी तालुक्यातील *श्रृती यरगट्टी ( AIR – 362 ALL INDIA RANK )* , यासोबत डेप्युटी डायरेक्टर स्टेट अकाउंटंट अँड ऑडिट डिपार्टमेंट कर्नाटक गव्हर्नमेंट प्रोबेशनरी श्रीमती *नाझिया इकबाल पटवेगार* आणि युनियन बँक ऑफ इंडिया अँड स्टेट बँक ऑफ इंडिया या परीक्षेत उत्तीर्ण झालेली अधिकारी *प्रतीक्षा पाटील* , रेल्वे विभागात अधिकारी आणि टीसी म्हणून कार्यरत असलेले *प्रकाश पाटील,* यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. यासह विविध परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या परीक्षार्थींचे मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला ; आणि याप्रसंगी सत्कार मूर्तींनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शनपर व्याख्यान प्रबोधन व मार्गदर्शन शिबिरात केले. कार्यक्रमाच्या शुभप्रसंगी दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळाचे सचिव डॉ. विक्रम एल. पाटील, भाऊराव काकतकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. एन. पाटील, ज्योती करिअर अकॅडमीचे संचालक आणि समन्वयक प्रा. अमित सुब्रमण्यम, ज्योती पदवी पूर्व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. डी. शेलार, बीसीए महाविद्यालयाचे प्राचार्य आनंद पाटील, बीबीए महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बसवराज कोळुचे, कवी प्राध्यापक निलेश शिंदे,

निवृत प्राचार्य डॉ. डी. एन. मिसाळे,प्रा. डॉ. आय. बी. वसुलकर, प्रा. डॉ. डी. टी.पाटील, प्रा डॉ निता पाटील, प्रा. डॉ अनिता पाटील, प्रा. डॉ. एम. एस.पाटील, माजी विद्यार्थी संघटनेचे समन्वयक प्रा. डॉ.एम. व्ही. शिंदे, ए.के.पाटील उपस्थित होते.

स्वागत व प्रास्ताविक बी.के. कॉलेजचे प्राचार्य डॉ. एस. एन. पाटील यांनी केले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय प्रा. शुभम चव्हाण यांनी करून दिला. सूत्रसंचलन शिवानी गायकवाड यांनी केले. तर ज्योती करिअर अकॅडमीचे संचालक प्रा. अमित सुब्रमण्यम यांनी आभार मानले. यावेळी शिवानंद यरगट्टी, अरुण यरगट्टी, प्रा. डॉ. अमित चींगळी, प्रा. सूरज पाटील, प्रा. नारायण तोराळकर, योगेश मुतगेकर, अझर मुल्ला क्रांतीराज तज्ञावंत, पुंडलिक गावडा सुरज पाटील तसेच दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळाचे पदाधिकारी, सदस्य, प्राध्यापक, शिक्षक, विद्यार्थी, पालक, माजी विद्यार्थी कर्मचारी आणि समाजातील नामवंत मान्यवर मंडळी व रसिक उपस्थित होते.


Independent Journalism Can’t Be Independent Without Your Support, Contribute By Clicking Below.

Leave a Reply