विनापरवाना वैद्यकीय उपचार करणाऱ्यांवर कारवाई
बेळगाव तालुक्यातील बेनकनहळ्ळी गावामध्ये ओम साईराज क्लिनिक येथे कोणत्याही परवानगी विना वैद्यकीय उपचार करत असलेले “श्री राजू एम पाटील” यांच्या दवाखान्यावर जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी अचानक छापा टाकून नोटीस देऊन दवाखाना सील केला.
या छाप्यामध्ये जिल्हा आरोग्य आणि कुटुंब कल्याण अधिकारी डॉक्टर महेश बी कोणी जिल्हा आयुष्य अधिकारी डॉक्टर श्रीकांत सुनडोळी आणि श्री मंजुनाथ बिसनळी के पी एम आरोग्य निरीक्षक यांच्या पथकाने अचानक छापा टाकून क्लिनिकला नोटीस बजावून दवाखान्यात सील केला.