नागरिकांना पाणीपुरवठा करण्यासाठी धावून येत आहेत साजिद शेख
बेळगाव:शहरामध्ये कडाक्याचे ऊन वाढले आहे त्यामुळे सर्वत्र पाण्याची टंचाई होत असलेली दिसून येत आहे. त्याचप्रमाणे शहरातील कॅन्टोन्मेंट परिसरात गेल्या सहा महिन्यापासून पाण्याची समस्या उद्भवत आहे. हे पाहून कॅन्टोन्मेंटचे माजी उपाध्यक्ष साजिद शेख यांनी गेल्या तीन-चार महिन्यापासून सतत कॅम्प भागातील लोकांना टँकरने पाणीपुरवठा करत आहेत.
आज साजिद शेख बोलताना म्हणाले की बेळगाव शहरामध्ये तसेच कॅम्प परिसरात पाण्याची मोठी समस्या होत आहे .यासंदर्भात आम्ही अनेक वेळा जिल्हाधिकारी तसेच कॅन्टोन्मेंट सीओ यांना निवेदन देखील दिले आहे.तरीसुद्धा याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केलेले आहे.सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने नागरिकांना पाण्याची मोठी समस्या होत आहे. विहिरीतील व बोरवेल मधील पाण्याने तळ गाठला आहे. यामुळे नागरिकांना मोठी समस्या उद्भवत आहे.
मी गेल्या तीन महिन्यापासून आम्ही व स्वखर्चातून विनामूल्य कॅम्प परिसरातील नागरिकांना पाणीपुरवठा करत आहोत. यापुढेही करत राहणार असे त्यांनी सांगितले तसेच सरकारने पाण्याची समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करावे व मी देवाकडे एकच प्रार्थना करतो की लवकरात लवकर पाऊसला सुरू होऊन लोकांना पाण्यापासून सुटका व्हावी.