जागेच्या वादातून बेकरीचे नासदुस केल्याची घटना घडली
पिरनवाडी येथील एका व्यवसायिकाच्या बेकरी मध्ये शिरून काही व्यक्तींनी दुकानातील साहित्याची नासधुस केल्याची घटना उघडकीस आली आहे.पिरणवाडी येथील बेकरीचा वाद सध्या उफाळला असून अनेक दिवसांपासून या वादामध्ये अडकलेल्या व्यवसायिकाच्या बेकरी मधील साहित्याचे नुकसान करण्यात आले आहे.
पिरनवाडी येथे बेकरी विक्री मालक सलीम मलिक रियाज नसर्डी यांच्या बेकरीमध्ये शिरून एका आठ ते दहा जणांच्या गटांनी साहित्याची नासधूस केली आहे.
त्याचबरोबर सर्व साहित्य रस्त्यावर फेकून देऊन शटर बंद केले आणि काम करणाऱ्या कामगार बंद वर देखील हल्ला केला आहे ही घटना 30 मे रोजी घडली असून या संदर्भात मालकाने आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
मात्र याबाबत पोलिसांनी दोन ते तीन दिवस उलटून गेले तरी कोणत्याही प्रकारची कारवाई केली नसल्याचे दिसत आहे.