दूधगंगा नदीत एक तरुण बुडून मृत्यू घटना आज उघड झाली आहे.सागर दिनकर वाळके वय 22 याचा नदीत बुडून मृत्यू झाला आहे.
सदर घटना चिकोडी तालुक्यातील शिरगाव येथे घडली असून सागर कपडे धुण्यासाठी आपल्या काकू समवेत नदी काठावर गेला असता नदी पात्रत उतरला त्याला पोहता येत नसल्याने बुडून त्याचा मृत्यू झाला.
यावेळी याठिकाणी उपस्थित असलेल्या मीनाक्षी कांबळे यांनी आरडा ओरड केला यावेळी नागरिकांनी घटनास्थळी तातडीने धाव घेत अग्निशमन दलाचे जवानांना बोलवून घेतले.
त्यानंतर अग्निशमन दलाचे जवानांनी मृतदेह शोधण्याचा प्रयत्न केला मात्र रात्री उशिरापर्यंत त्याचा शोध लागला नाही. तर आज पहाटे पुन्हा शोधूनही सुरू असताना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे