आसिफ (राजू) सेठ यांनी BIMS जिल्हा रुग्णालयाला दिली भेट
बेळगाव उत्तर मतदारसंघाचे आमदार आसिफ (राजू) सेठ यांनी आज बेळगाव येथील BIMS जिल्हा रुग्णालयाला भेट देऊन विविध विभागांची पाहणी केली. यावेळी त्यांनी सर्वांना सामंजस्याने काम करण्याच्या सूचना देत शासनाकडून आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले.
बेळगाव उत्तर मतदारसंघाचे आमदार म्हणून निवडून आल्यानंतर आसिफ (राजू) सेठ यांनी नव्या जोमाने कामाला सुरुवात केली आहे. कालच त्यांनी मुत्यानट्टी गावासाठी पाणीपुरवठा प्रकल्पाचा शुभारंभ केला. त्यानंतर आज त्यांनी शहरातील बिम्स रुग्णालयाला भेट देऊन विविध विभागांची पाहणी केली.
तसेच रुग्णांना दिल्या जाणाऱ्या जेवणाचा दर्जा तपासला. यावेळी आमदार सेठ यांनी बिम्सचे संचालक डॉ.अशोक शेट्टी, डॉ.ए.बी.पाटील, व इतर महत्त्वाच्या अधिकार्यांशी चर्चा करून रूग्णालयाच्या सद्यस्थितीची माहिती घेतली.
यावेळी आमदार सेठ यांच्या निदर्शनास BIMS रुग्णालयात डॉक्टर आणि नर्सिंग स्टाफची कमतरता असल्याची गोष्ट निदर्शनास आली.यावेळी त्यांनी बीम्स मध्ये जादा स्टाफ निवड करण्याची सूचना केली.