क्रांतिवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या 140 व्या जयंती साजरी
हिंदुराष्ट्र सेना आणि श्री राम सेना बेळगाव यांच्या वतीने हिंदू संघटक महान राष्ट्रभक्त आद्य क्रांतिवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या 140 व्या जयंती निमित्त मध्यवर्ती कारागृह हिंडलगा येथे वीर सावरकर यांच्या प्रतिमेचे पूजन व श्रीफळ वाढवून अभिवादन करण्यात आले.
यावेळी हिंदूराष्ट्र सेनेचे अध्यक्ष रविकुमार कोकितकर यांनी वीर सावरकर यांच्या प्रतिमेचे पूजन केले व सावरकर यांच्या त्यागाचे व त्यांच्या राष्ट्र भक्ती बदल कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.
याप्रसंगी रविकुमार कोकितकर, विनायक हांगिर्गेकर, जयवंत साळुंके, ओमकार गोडसे परशुराम शहापूरकर, प्रभाकर पाटील, दादा गुरव, संतोष जाधव , किशोर शहापूरकर, विशाल मुतगेकर, कल्लाप्पा पाटील, युवराज मोहते, चनाप्पा शिरगावकर, व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.