This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

May 2024
S M T W T F S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  

| Latest Version 9.4.1 |

State

*शांताई वृद्धाश्रमामध्ये श्री स्वामी समर्थांच्या पादुका पूजन*

D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

शांताई वृद्धाश्रमामध्ये श्री स्वामी समर्थांच्या पादुका पूजन

दिनांक २४/०५/२०२३ रोजी शांताई वृद्धाश्रमामध्ये श्री स्वामी समर्थांच्या पादुका पूजन करण्यात आले. बेळगाव शहरातील आराधना संस्थेचे अध्यक्ष श्री सुनील चौगुले यांनी पुढाकार घेऊन स्वामी समर्थांचे वंशज श्री श्री निलेश महाराज आणि त्यांच्याबरोबर इतर महाराज उपस्थित होते. शांताई वृद्धाश्रमा जवळ असलेल्या परिसरातील, बामणवाडी व कुठलवाडी या भागातील वारकरी मंडळींनी टाळाच्या गजरामध्ये पादुका चा स्वागत केले.

श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या पादुकांचे पुजन (अभिषेक) श्री यतीन कुलकर्णी यांनी केले आणि त्यानंतर शांताई वृद्धाश्रमामध्ये एक तास भजनाचा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमासाठी बेळगाव शहरातून श्री सुनील आपटेकर, श्री सिद्धार्थ उंद्रे, श्री संतोष ममदापूर, श्री वसंत बालिका व श्री अरुण पोटे आणि सर्व शांत आवडता समाज हितचिंतक उपस्थित होते,

सर्वांनी पादुकाचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले त्यानंतर प्रसादाचा कार्यक्रम करण्यात आला हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री संजय वालवालकर, श्री अरुण पोटे, सौ मारिया मोरे, श्री आलन मोरे व श्री दत्ता घोरपडे आणि इतर मंडळींनी परिश्रम घेतले. शेवटी शांताई वृद्धाश्रमाचे कार्याध्यक्ष श्री विजय मोरे यांनी आभार व्यक्त केला. श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या कृपेने कार्यक्रम छान व सुरेख झाला.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now