दारूच्या नशेत धुंद :मारली गटारी दोन दिवस वस्ती
दारूच्या नशेत कोण काय करेल सांगता येत नाही. पगार झाला म्हणून खिशात चार पैसे खेळू लागले आणि बेवड्याने इतकी दारू पिली की तो दारूच्या नशेत कुठे होता हे त्यालाही माहीत नव्हते. तब्बल दोन दिवसांनी त्याला शुद्ध आली आणि तो गटारातून बाहेर निघाला.
हो गटारीतून बेळगांव येथील मध्यवर्ती बस स्थानका जवळ असलेल्या एका गटारीत एक उत्तर प्रदेशचा युवक दारूच्या नशेत गटारीत पडला होता. यावेळी तब्बल दोन दिवस तो गटारीमध्येच होता.
त्यांनी इतकी दारू प्यायली होती की त्याला कोणत्याही गोष्टीचा थांगपत्ता लागला नाही तब्बल दोन दिवस उलटून गेल्यावर त्याला शुद्ध आली आणि त्यांनी गटारीतून बाहेर येण्याचा प्रयत्न केला.यावेळी नागरिकांनी ही सर्व परिस्थिती पाहिली आणि येथील समाजसेवकांना बोलविले. https://www.instagram.com/reel/CslZZWAhj7h/?igshid=NTc4MTIwNjQ2YQ==
यावेळी समाजसेवकांनी त्याला बाहेर काढून त्याच ठिकाणी त्याला आंघोळ घातली आणि जिल्हा रुग्णालयात दाखल केले बेळगाव मध्ये घडलेला हा प्रकार पाहून अनेक मद्यपिंनी दारू नको रे बाबा असे म्हटल्याचे दिसून आले.