13 वर्षीय बालिकेचा विजेच्या धक्क्याने मृत्यू
सुट्टी करिता आपल्या आजोळी आलेल्या एका तेरा वर्षीय बालिकेचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची घटना मच्छे जवळ नेहरूनगर मध्ये घडली.
मच्छे नेहरूनगर येथील बोंगाळे कुटुंबीयातील बालिकेचा हेस्कॉमच्या गलथान कारभारामुळे मृत्यू झाला. मधुरा केशव मोरे वय तेरा असे विद्युत धक्क्याने मृत्यू झालेल्या बालिकेचे नाव आहे.
मधुरा हिचे मुळगाव यळळूर राजहंस गड येथे मात्र तिचे वडील सध्या कामानिमित्त कोल्हापूर येथे वास्तव्यास आहेत ती सुट्टी निमित्त तिच्या आजोळी आली होती यावेळी ती खेळत असताना तिचा हात होल्टेज केबलला लागला आणि पाहता क्षणी ती उडून दुसऱ्या मजल्यावरून पडली आणि जळून खाक झाली.
गेल्या दोन वर्षांपासुन सातत्याने हेस्कॉमकडे याबाबत तक्रार करण्यात आली होती. मात्र अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केल्या असल्याने मधुराचा हाकनाक बळी गेला.