सोसाट्याचा वाऱ्यासह मुसळधार पावसाने शहराला झोडपून काढले
सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पावसाने बेळगाव शहर आणि परिसराला झोडपून काढले.विजांचा चमचमाट होऊन आकाश भरून आले आणि पावसाला प्रारंभ झाला.अचानक आलेल्या पावसाने लोकांची आसरा शोधताना तारांबळ उडाली. सोसाट्याच्या वाऱ्याने शहरात अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली.कॅम्प भागात रस्त्यावर झाडे पडल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता.
वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी होर्डिंग आणि जाहिरात फलक जमीनदोस्त झाले. गटारी रींची सफाई झाली नसल्याने अनेक ठिकाणी गटारी भरून रस्त्यावर पाणी साठले होते.सकाळपासूनच उष्म्यात कमालीची वाढ झाली होती.दुपारी वळीव पाऊस हजेरी लावेल असे वातावरण निर्माण झाले होते.
पण सायंकाळी पावसाने हजेरी लावली. दीड तासाहून अधिक काळ सोसात्या ट्याचा वारा आणि पावसाने अक्षरश झोडपून काढले.पावसामुळे मात्र हवेत गारवा निर्माण झाल्याने उकाड्याने त्रस्त झालेल्या जनतेला दिलासा मिळाला.