मंत्री सतीश जारकीहोळी यांना यमकनमर्डी मतदारसंघातील लोकप्रतिनिधींनी दिल्या शुभेच्छा
सचिव संपुट मंत्री सतीश जारकीहोळी यांचा डॉलर्स कॉलनी येथे अलतगा अगसगा म्हाळेनटी हंदिगनूर च्या लोकप्रतिनिधी यांच्याकडून के पि सी सी सदस्य मालगौडा पाटील यांच्या नेतृत्वाखाली सत्कार व शुभेच्छा देण्यात आली.
कर्नाटक विधानसभा निवडणूक संपल्या नंतर टॉप टेन मधील मताधिक्याने आलेले सतीश जारकीहोळी यांना मंत्री दर्जा देण्यात आले. गेल्या 6 दिवसापासून मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या रस्सीखेच मदे मुख्यमंत्री म्हणून वरुणा क्षेत्राचे आमदार सिद्धरामय्या यांचा तर उपमुख्यमंत्री म्हणून कणकपूरा चे आमदार डी के शिवकुमार यांचा नियुक्ती ए आय सी सी चे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे व राहुल गांधी यांनी केले.
त्या नंतर आमदार सतीश जारकीहोळी यांनाही सचिव संपुट मंत्री म्हणून नावं घोषित करण्यात आले. नाव घोषित झाल्यानंतर यमकानमर्डी मतदार संघाचे त्यांचे कार्यकर्ते व नेते तसेच राज्यभरातले कार्यकर्त्यांचे दौड बेंगळुरू येथील त्यांच्या डॉलर्स कॉलनी येथील निवासस्थानी भेटून शुभेच्छा दिले. या वेळी अलतगा अगसगा म्हाळेनटी हंदिगनूर च्या लोकप्रतिनिधी यांच्याकडून के पि सी सी सदस्य मालगौडा पाटील यांच्या नेतृत्वाखाली ग्राम पंचायत सदस्य अप्पयागौडा पाटील, अमृत मुद्देणवर, चेतक कांबळे, गुंडू कुरेन्नावर, कल्लाप्पा पाटील, निंगाप्पा नाईक, सुधीर गडकरी, बसवांनी बागानल, बाळू हनडेणांवर,पुंडलिक पाटील, सुरेश तिरमाळे, राहुल जाधव, चन्नाप्पा नाईक, लगमा नाईक, यल्लाप्पा कांबळे, वामन कंग्राळकर आदींच्या हस्ते सत्कार व शुभेच्छा देण्यात आली.
सत्काराला प्रत्युत्तर देताना मंत्री जारकीहोळी यांनी जानदेशचा कौल माझ्याबाजूने भक्कम पणाने तुम्ही सर्व लोक मिळून दिलात त्या सर्व गोष्टी लक्षात ठिवून गेले 15 वर्षे तुमचा सेवा केलेला तर आहेच त्याबरोबर निवडणूक पूर्वी दिलेल्या आश्वासने पूर्ण करणारच परंतु दुसरे कोणतीही समस्या असेल तरीही त्या समस्यांचा निवारण करण्याचा आश्वासन दिले.