बेळगावाचे 40.4 इतके तापमान वाढले
बेळगावात या उन्हाळ्यातील उच्चांकी तापमानाची नोंद झाली.40.4 इतके तापमान आज बेळगावात नोंदवले गेले.गेल्या काही दिवसापासून बेळगावात उन्हाचा तडाखा वाढला आहे.दररोज 35 हून अधिक तापमान बेळगावात काही दिवसात नोंदवले गेले आहे.पूर्वी गरिबांचे महाबळेश्वर म्हणून बेळगावची ओळख होती .
उन्हाळ्यात पंख्याची देखील पूर्वी आवश्यकता भासत नव्हती .गेल्या काही वर्षात झालेल्या वृक्ष तोडीनुळे आणि निर्माण झालेल्या काँक्रिटच्या जंगलामुळे बेळगावचे तापमान वाढत चालले आहे.उन्हामुळे गुरुवारी रस्त्यावर लोकांची गर्दी दिसून आली नाही.
दुपारच्या वेळी घराबाहेर पडणे कडक उन्हामुळे लोक टाळत आहेत.वाढत्या उन्हामुळे अनेक स्वयंसेवी संस्थांनी ठिकठिकाणी पाण पोईची सोय केली आहे.त्यामुळे तहानलेल्या व्यक्तींची पिण्याच्या पाण्याची सोय झाली आहे.