2 महिन्यापासून गावात पाणी नसल्याने नागरिकांची वाढली डोकेदुखी
कंग्राळी बुद्रुक गावामध्ये पाण्याची मोठ्या प्रमाणात समस्या उद्भवली आहे.या भागात गेल्या दोन महिन्यांपासून नळाला पाणी येत नसल्याने नागरिकांचे जगणे मुश्किल झाले आहे. त्यामुळे गावाला पाणीपुरवठा सुरळीत करण्यात यावा अशी मागणी आज कंग्राळी गावातील महिला व नागरिकांनी ग्रामपंचायतीवर मोर्चा काढून केली आहे.
जर आपल्या गावातील पाण्याचे समस्या लवकरात लवकर सुटली नाहीत. तर तीव्र आंदोलन छेडू असा इशारा देखील समस्त गावातील महिलांनी ग्रामपंचायतिला दिला आहे.
कंग्राळी बुद्रुक गावामध्ये गेल्या दोन महिन्यांपासून हर घर पाणी पुरवठा व जे जे एम योजनेअंतर्गत 24 तास पाणीपुरवठा करण्यासाठी पाईप लाईन घालण्याच्या कामाला सुरुवात केली आहे. यासाठी गावांमध्ये गेल्या दोन महिन्यापासून पाणीपुरवठा ठप्प झाला आहे. यामुळे नागरिकांना दैनंदिन जीवनात वापरासाठी लागणाऱ्या पाण्याची मोठी समस्या उगवली आहे.
गावांमध्ये गेल्या दोन महिन्यांपासून पाणी सुरळीत नसल्याने नागरिकांची डोकेदुखी वाढली आहे.त्यामुळे या भागातील पाणी पुरवठा सुरळीत करावा आणि लवकरात लवकर आपली मागणी पूर्ण करावी अशा मागणीचे महिलांनी व ग्रामस्थांनी ग्रामपंचायतला केली आहे.