विजयाच्या जल्लोष करते वेळच्या वादातून झाला खून
कर्नाटकात निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर काँग्रेस पक्षांनी जल्लोष करतेवेळी दोन गटात वादावादी झाली.यावेळी जल्लोषावेळी भाजप कार्यकर्त्याचा खून झाल्याची घटना कोलार जिल्ह्यातील होसकोटे येथे घडली आहे.
या घटनेत भाजप कार्यकर्ता कृष्णापा व 55 हे मृत झाले आहेत माजी मंत्री एमटीबी नागराज यांच्या विरोधात काँग्रेसचे उमेदवार शरद बच्चेगौडा विजयी झाले त्यानंतर त्यांच्या समर्थकांनी जल्लोष करताना कृष्णाप्पा यांच्या घरासमोर उशिरापर्यंत फटाके फोडले यावेळी कृष्णाप्पा यांनी आक्षेप घेतल्याने दोन गटात वाद झाला.
त्यानंतर काँग्रेसकर्त्यांनी भाजप कार्यकर्त्यावर हल्ला करून त्याला जागीच ठार केले सदर घटनेची नोंद नंदगुडी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.