यंदा बेळगाव मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची 104 वी जयंती परंपरेनुसार आणि मिरवणुकीने जल्लोषात साजरी करण्यासाठी संपूर्ण बेळगाव शहर सज्ज झाले आहे.
शनिवार दिनांक 27 मे रोजी शहरात शिवजयंती मिरवणूक ची ही ऐतिहासिक परंपरा गेल्या कित्येक वर्षांपासून अशाच प्रकारे चालू आहे. या शिवजयंती मिरवणूक मध्ये देखावे सादर करण्याकरिता सर्व युवक युवतींची लगबग चालू झाली आहे.
बेळगाव मध्ये होणाऱ्या शिवजयंती मिरवणूक मध्ये अनेक देखावे सादर करण्यात येतात. यामध्ये प्रामुख्याने जिवंत देखावा लाठी मेळा ढोल ताशा ध्वज पथक लेझीम वेळा हत्ती घोडे अशा शिवमय वातावरणात शहरात चित्ररथ मिरवणूक काढली जाते.
आता या शिवजयंती चित्र मिरवणुकीला अवघे 11 दिवस शिल्लक राहिले असल्याने साहित्याची जमा जमा करण्यात तसेच शिवचरित्रावरील प्रसंग सादरी करण्यासाठी पात्रांची निवड करण्यात युवा वर्ग व्यस्त झाला आहे.
दरवर्षीपेक्षा यावर्षी कोणता देखावा सर्वात आकर्षक ठरणार याकडे सुद्धा सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. त्याचबरोबर शहरात युवक युवती लहान मुले तसेच महिला वर्ग देखील शिवजयंती निमित्त निघणाऱ्या चित्र मिरवणुकी करिता देखावे सादर करण्याकरिता सज्ज झाला आहे.